Wed, Nov 21, 2018 22:20होमपेज › Sangli › सोन्याचा वस्तरा ब्लेड मात्र स्टीलचे

सोन्याचा वस्तरा ब्लेड मात्र स्टीलचे

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 7:57PMसांगली : प्रतिनिधी

हौसेला मोल नसते. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे अवलिया असतात. अशाच अनोख्या प्रकाराचे दर्शन येथील   काशिद यांनी घडविले आहे. त्यांनी दाढी करण्यासाठी आता दहा तोळे सोन्याचा वस्तरा बनविला आहे. मात्र दाढी साध्या ब्लेडने होणार आहे. या त्यांच्या अनोख्या हौसेची जोरदार चर्चा सुरू आहे. आज प्रत्येक व्यवसायात स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार आपला व्यवसाय अधिकाधिक चांगला, ग्राहकोपयोगी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असतात. याला काहीजण हौसेचीही जोड देतात. काहीजणांनी खानावळीत चांदीची भांडी वापरली तर काहीजणांनी वेगवेगळे साहित्य सोन्याचे बनवून लोकांना आकर्षित केले. अशीच अफलातून शक्कल   काशिद यांनी लढविली. त्यांनी दहा तोळे, 18 कॅरटचा सोन्याचा वस्तरा बनवला आहे. त्यासाठी त्यांनी साडे तीन लाख रुपये मोजले आहेत. हा सोन्याचा वस्तरा बनवणे तशी सोपी गोष्ट नाही. 

अनेक सराफ व्यावसायिकांनी सुरुवातीला त्यांना नकार दिला.  मात्र सांगलीतील चंदूकाका सराफ पेढीने सोनेरी वस्तरा बनविण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी त्यांनी पुण्यातून एका कुशल कारागिरांकडून हुबेहूब सोन्याचा वस्तरा बनवून घेतला. त्यांनी या सोनेरी वस्तर्‍याने दाढी करण्याचा नुकताच प्रारंभ केला.