Wed, Mar 27, 2019 02:07होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्याला 1 लाख रोप लागवडीचे ‘लक्ष्य’

कडेगाव तालुक्याला 1 लाख रोप लागवडीचे ‘लक्ष्य’

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 8:12PMदेवराष्ट्रे : वार्ताहर 

शासनाने चालू वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प केला आहे. यात कडेगाव तालुक्यासाठी एक लाख रोप लागवडींचे लक्ष्य देण्यात आले आहे. यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे.जिल्हानिहाय व तालुकानिहाय लक्ष्य  देण्यात आले आहे.या वर्षी कडेगाव तालुक्याला या योजनेतून 1 लाख 2 हजार 447 वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. काही विभागाचे वृक्ष लागवडीचे खड्डे तयार आहेत. मात्र कडेगाव कृषि विभागाला वृक्षलागवडीचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा उद्दात हेतू ठेऊन शासनाने वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन 2018-19 मध्ये 13 कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार शासनाने केला आहे. 

कडेगाव तालुक्यातील वनविभाग, कृषि विभाग, सहकार निबंधक, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय,  बांधकाम  पशुसंवर्धन, छोटे पाटबंधारे यांसह विविध विभागांना वृक्षलागवडीचे लक्ष्य  देण्यात आले आहे. 1 लाख 2 हजार 447 वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. झाडे लावण्यासाठी खड्डे काढणे व 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यासाठी  प्रादेशिक वनविभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.