Fri, Jul 19, 2019 14:15होमपेज › Sangli › भाजपला सत्ता द्या; नवी ओळख निर्माण करू

भाजपला सत्ता द्या; नवी ओळख निर्माण करू

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

भाजपला महापालिकेची सत्ता द्या, सांगलीला बहुचांगली करून नवी ओळख निर्माण करू, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. विश्रामबाग येथे भाजप संपर्क कार्यालयात वाढदिनानिमित्त मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने शुभेच्छा मेळाव्यात ते बोलत होते. 

गाडगीळ म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्याविषयी खूप उलट-सुलट चर्चा केल्या. टीका झाली. पण मी माझ्या कामातूनच टीकाकारांना उत्तर दिले. मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास मी चार वर्षांत सार्थ ठरविला आहे. शासन निधीतून 33 कोटी रुपये आणून शहर खड्डेमुक्‍त केले. राजकीय द्वेष न ठेवता महापालिकेच्या विविध योजनांसाठी निधी मिळवून दिला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडे सत्ता द्याल तर सांगलीची नवी ओळख निर्माण करू. मनपा भ्रष्टाचारमुक्‍त करू.कवठेपिरानचे माजी सरपंच भीमराव माने म्हणाले, कवठेपिरानच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोणतेही प्रयत्न न करता कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. हिंदकेसरी स्मारकासाठी अडीच कोटीचा निधी मिळाला आहे. हे सर्व सुधीर गाडगीळ यांच्यामुळेच झाले. 

सांगली जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, शहर खड्डेमुक्‍त झाल्याने सांगलीची ओळख आता चांगल्या रस्त्यांची सांगली असे झाले आहे. वाहतूकदारच साहजिकच त्याचा आपोआप देशभर प्रचार करतील. श्री. गाडगीळ यांनी कोणालाही कोणत्याच कामासाठी अडवले नाही. त्यांनी अनेक वर्षे रखडलेला टान्स्पोर्टनगर मधील प्रश्‍नही सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मकरंद देशपांडे म्हणाले, श्री. गाडगीळ यांनी यापूर्वीची राजकीय परंपरा बदलली. राज्याने केंद्राच्या माध्यमातून अनेक कामे केली. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवले. श्री. गाडगीळ यांच्या कार्यालयात सर्वसामांन्य व्यक्ती कधीही, केव्हाही आपले  आपले प्रश्‍न मांडून सोडवू शकतो. यावेळी शेखर इनामदार, दीपक शिंदे, डी. के. पाटील, भारती दिगडे, विशाल मोरे, योगेश कापसे, विनायक सिंहासने, गणपती सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags : Sangli, power, BJP, create, new, identity