होमपेज › Sangli › ‘जलयुक्‍त’च्या नवीन निकषाची अट शिथिल करा

‘जलयुक्‍त’च्या नवीन निकषाची अट शिथिल करा

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 8:06PM

बुकमार्क करा
ऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

वाळवा तालुक्यातील लाडेगाव, ऐतवडे बुद्रूक, ठाणापुडे, करंजवडेसह वारणा पट्ट्यातील विहीर बागायत गावात नवीन बंधार्‍यांसाठी 28 प्रस्ताव  मंजुरीसाठी दिले होते. ते विविध निकष लावून रद्द करण्यात आले. त्या नव्या निकषांची अट शिथिल करून त्या बंधार्‍यांसाठी निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना लाडेगावचे सरपंच रणधीर पाटील यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की,  ओढ्या-ओघळीवर नवीन सिमेंट बंधारे बांधणे, जुने सिमेंट बंधारे दुरूस्त करणे, ओढे-ओघळी खोलीकरण व रुंदीकरण करणे,  पिण्याच्या पाण्याचे दुर्लक्षित आडांची दुरूस्ती व गाळ काढून त्याचे सुशोभिकरण करणे यासाठी निधी मिळावा. लाडेगाव येथील सेवा सोसायटीच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नगरसेवक विक्रम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.