Thu, Jul 18, 2019 04:59होमपेज › Sangli › बामणोलीत गॅसच्या स्फोटात दुकान खाक

बामणोलीत गॅसच्या स्फोटात दुकान खाक

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:30PM

बुकमार्क करा
कुपवाड : वार्ताहर 

बामणोली (ता. मिरज) येथील औद्योगिक वसाहतीमधील राजेंद्र बाळू साठे (रा. दत्तनगर, बामणोली) यांच्या चहाच्या दुकानातील गॅसचा स्फोट होऊन  खोके जळून खाक झाले. अंदाजे सत्तर हजारांचे नुकसान झाले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः बामणोलीतील औद्योगिक वसाहतीमध्ये साठे यांचे चहाचे दुकान आहे. सोमवारी (दि.15)रात्री साठे  दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. कुपवाड एमआयडीसीतील अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत खोक्यातील चहा नाष्टासाठी आणलेल्या साहित्यासह पूर्ण खोके आगीत जळाले आहे.