Sat, Aug 24, 2019 23:26होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये गॅस गळतीने घराला आग

कुपवाडमध्ये गॅस गळतीने घराला आग

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:29PMकुपवाड : वार्ताहर

शहरातील तराळ गल्लीत भाड्याने राहणार्‍या असलम मन्सूर मुजावर (वय 50) यांच्या खोलीत शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक घरगुती सिलिंडरमधील गॅसची गळती  झाली. त्यामुळे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी खोलीतील सर्व साहित्य व छत जळून खाक झाले.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, असलम मुजावर  तराळ गल्लीत भाड्याने राहतात.  ईदचा सण असल्याने लगबग सुरू होती. स्वयंपाकासाठी शुक्रवारी दुपारी सिलिंडर जोड़ला होता. स्वयंपाक सुरू असताना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक गॅसची गळती  होऊन  आग लागली. 

खोलीतून सर्वानी बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.  खोलीत आगीच्या ज्वाला पसरल्याने कौलारू व लाकडी छत जळून खाली कोसळले. खोलीतील सर्व कपड़े, धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले.  सांगलीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. यात मुजावर यांचे हजारोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.