Thu, Jan 24, 2019 00:02होमपेज › Sangli › सोरडीतील अपघातात दरिबडचीचे अभियंता ठार 

सोरडीतील अपघातात दरिबडचीचे अभियंता ठार 

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 11:42PMजत : प्रतिनिधी 

सोरडी-जत रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन  अभियंता गणेश व्यंकटेश जेऊर (वय 30, मूळ गाव दरिबडची, सध्या रा. विद्यानगर, जत) हे ठार झाले.तसेच सोरडी येथील एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी संगतीर्थपासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.याबाबतची फिर्याद विनायक वाघमारे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे.

अभियंता  जेऊर  पुणे येथे एका कंपनीत नोकरी करतात. ते येथील विद्यानगर येथे राहतात. गणेश यांची दरिबडची येथे शेती आहे. तेथे  द्राक्षबाग  आहे. त्याची देखरेख करण्यासाठी गणेश  गावी  येतात. गुरुवारी ते दुचाकीवरून (एमएच-10, एएल-6399) दरिबडचीकडे जात होते. धर्मा मनोहर काळे (वय 35, रा. सोरडी) व  त्यांची पत्नी दुचाकी ( एमएच-12, बीएल- 2136) वरून जतकडे येत होते. 

वळसंग वनजमिनीजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.त्यात जेऊर व काळे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. तिघांना जतला आणत असताना गणेश यांचा वाटेत मृत्यू झाला. काळे दाम्पत्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. जेऊर येथे शिक्षण घेत ते अभियंता झाले. 3  महिन्यांपूर्वीच  त्यांचा विवाह झाला होता.