Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Sangli › महिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेवर सामूहिक बलात्कार

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 02 2018 12:02AMतासगाव : शहर प्रतिनिधी

तुरची फाटा (ता. तासगाव) येथे  माण  तालुक्यातील (जि. सातारा) गर्भवती महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तासगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावेळी तिच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांंनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि अनोळखी चौघे (पूर्ण नावे, पत्ता नाहीत) अशी त्यांची नावे आहेत. 

तासगाव पोलिसांनी दिलेली  माहिती अशी ः पीडित महिला ही माण तालुक्यातील आहे. ती पतीसह हॉटेल व्यवसाय करते. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी एक विवाहित जोडपे हवे होते. मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन करुन ‘तुरची फाटा येथे एक जोडपे आहे. वीस हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी घेऊन या,’ असे सांगून बोलावून घेतले. मंगळवारी सायंकाळी पती-पत्नी तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेऊन पोहोचले. त्यावेळी मुकुंद माने याने त्याच्यासोबत असलेल्या सागरला ‘यांना मारा,’ असे सांगितले. सागरने दोघांनाही प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर  महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्यांची सोनसाखळी आणि रोख 20 हजार काढून घेतले. यानंतर दुचाकीवरून आणखी चौघे जण त्या ठिकाणी आले. महिलेच्या पतीला तिथे असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले. महिलेला ओढून तेथीलच एका खोलीमध्ये नेले. तिथे सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार आहे. यानंतर पतीला त्या ठिकाणी आणण्यात आले. ‘इथून गप निघून जायचे. पोलिसांत जाऊ नका. तुमचे कोणी ऐकणार नाही. मी इथलाच आहे,’ असे सांगून दम दिला. सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले  तपास करीत आहेत.