Sat, Nov 17, 2018 06:40होमपेज › Sangli › जयसिंगपुरात जुगार अड्ड्यावर  छापा; चौघांना अटक

जयसिंगपुरात जुगार अड्ड्यावर  छापा; चौघांना अटक

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:28AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या ग. नं. 11 मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 4 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. अनिल धर्मा लोंढे (वय 32, रा. 11 वी गल्‍ली, जयसिंगपूर), संतोष भीमराव खोत (32, रा. कुपवाड), सत्यजित ऊर्फ शेखर विजय माले (32, रा. 7 वी गल्‍ली, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) व इकबल ऊर्फ हाफिज मेहबूब बारगीर (49, रा. भिलवडी) अशी ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

ही कारवाई सायंकाळी पावणेसातच्या सुमारास करण्यात आली. मात्र, याबाबत  फारच गोपनीयता पाळण्यात आली होती. ‘कलश’ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू होता. कारवाईत 14 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. त्यामध्ये 4 हजार 730 रोकड, 4 मोबाईल, पत्ते यासह जुगाराचे साहित्य जप्‍त करण्यात आले. जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही कारवाई केली. चंद्रहीरा कॉम्प्लेक्समध्ये हा अड्डा सुरू होता.