होमपेज › Sangli › नोटाबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत : आ. जयंत पाटील

नोटाबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत : आ. जयंत पाटील

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 10:18PMइस्लामपूर : प्रतिनिधी

नोटाबंदी व जीएसटीमुळे बांधकामासह विविध उद्योग-व्यवसायांचा वेग मंदावला आहे. त्यातून सामान्य माणसाला मोठी झळ बसली आहे. गुजरात विधानसभा निवडणुका नसत्या, तर केंद्र शासनाने जीएसटीमधून ज्या  वस्तूंचे दर कमी केले ते दर कमी केले नसते, असा आरोप माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.

येथे क्रीडाई संस्थेच्यावतीने बांधकाम व्यवसायाचे पश्‍चिम महाराष्ट्रातील  प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते झाले. माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव पारेख, अभिनेता राहुल मगदूम, निर्माता दिग्दर्शक संजय खांबे  उपस्थित होते. 

आ. पाटील पुढे म्हणाले, इस्लामपूरच्या शेजारी पेठ येथे एमआयडीसी आणून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र ही एमआयडीसी मी करतोय म्हटल्यावर काही लोकांनी पुढाकार घेऊन या शासनाकडून ती रद्द केली आहे. क्रीडाईच्या जीएसटी अडचणीबद्दल मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना भेटू. त्यांना समजून सांगितल्यावर ते दिल्ली येथील जीएसटी कौन्सिलला सांगू शकतात. 
मानसिंग नाईक, दिलीप पाटील, दिग्दर्शक संजय खांबे यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णेचे संचालक अमोल गुरव यांनी स्वागत केले. क्रीडाईचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, विजय पाटील, संजय कोरे, खंडेराव जाधव, धैर्यशील पाटील, शहाजीबापू पाटील, सुहास पाटील, संजय पाटील, शंकर चव्हाण, नगरसेविका जयश्री माळी, संजय खिलारे, महेश यादव, दत्तात्रय माने उपस्थित होते.

उपाध्यक्ष यशवंत गुणवंत, सचिव गणेश पाटील, सतीश पाटील, राजेंद्र माळी, विजय पाटील,उमेश रायगांधी यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी व सदस्यांनी नियोजन केले.