Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Sangli › ग्रामसचिवालयासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार कदम

ग्रामसचिवालयासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार कदम

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:47PMवाळवा : प्रतिनिधी

सर्वांना अभिमान वाटेल अशी नागठाणे येथे ग्रामसचिवालयाची इमारत उभी केली जाईल. त्यासाठी  1 रुपयाही कमी पडू देणार नाही, असा विश्‍वास आ. विश्‍वजित कदम यांनी नागठाणे येथे बोलताना व्यक्‍त केला. ग्रामसचिवालयाची पायाभरणी आ. विश्‍वजित कदम यांच्या हस्ते व महेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सरपंच जयश्री मांगलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

आ. कदम म्हणाले, ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यात असताना काही मंडळींना परस्परच कार्यक्रम घेण्याचा काय अधिकार आहे? शासकीय अधिकार्‍यांनीही कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. एक वर्षानंतर पुन्हा काँगे्रसचे सरकार येणार आहे, हे ध्यानात घ्यावे. आज लोक विरोधकांच्या विश्‍वासघाताला कंटाळले आहेत. नोटबंदी, बेरोजगारी, अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या. फसवी कर्जमाफी, धनगर आणि मराठा आरक्षणाबद्दल केलेली  फसवणूक यामुळे जनता शहाणी झाली आहे. शेवटच्या श्‍वासापर्यंत पलूस, कडेगावच्या जनतेच्या विकासासाठी जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही, असे आ. कदम म्हणाले. 

महेंद्र लाड, कुमार शिंदे, आनंदराव कोरे, अशोक पाटील, सुनील माने यांचीही भाषणे झाली. आ. मोहनराव कदम यांच्या आमदार निधीतून केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटनही आ. विश्‍वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच झाकीर लांडगे, बाजीराव मांगलेकर, पी.के. पाटील, वंदना माने, महादेव माने, रामचंद्र मांगलेकर, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेखा भाडळकर यांनी आभार मानले.