Fri, May 24, 2019 21:03होमपेज › Sangli › खूनप्रकरणी फरारी संशयितास अटक

खूनप्रकरणी फरारी संशयितास अटक

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:11PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार असलेला गुंड रवि मानेच्या खून प्रकरणातील फरारी संशयितास गुरुवारी करोली (टी) (ता. कवठेमहांकाळ) येथे अटक करण्यात आली. गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. आठ महिन्यांपूर्वी रवि मानेचा कलानगर परिसरात खून करण्यात आला होता.तेव्हापासून हा संशयित फरारी होता. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सनी दरिकांत कांबळे (वय 35, रा. संजयनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रवि माने पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. एप्रिलमध्ये तडीपार असतानाही तो भावाच्या वाढदिवसासाठी सांगलीत आला होता. मंडपाचे साहित्य घेण्यासाठी गेल्यानंतर सनी कांबळे, दसरत पवार यांच्यासह पाचजणांनी त्याचा  पाठलाग करून खून केल्याचा आरोप आहे.  घटनेनंतर दसरत पवारसह अन्य संशयितांना अटकही करण्यात आली होती. सनी कांबळे घटना घडल्यापासून फरारी होता. गुरुवारी तो करोली (टी) येथे येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह सापळा रचून अटक केली.    त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आवळे, सागर लवटे, मेघराज रूपनर, विमल नंदगावे यांच्या पथकाने कारवाई केली.