Sun, Mar 24, 2019 12:51होमपेज › Sangli › देवराष्ट्रेत दोन महिन्यांपासून गायब असलेल्या व्यक्‍तीचा सांगाडा सापडला

देवराष्ट्रेत दोन महिन्यांपासून गायब असलेल्या व्यक्‍तीचा सांगाडा सापडला

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 11:30PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शंकर सोपान खोपकर (वय 65) हे 20 जानेवारीपासून घरातून गायब झाले होते, तशी तक्रार चिंचणी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. रविवारी देवराष्ट्रे येथील शेतात त्यांच्या शरीराचा  सांगाडा सापडला आहे. शेजारी पडलेल्या वस्तूंवरून हा सांगाडा खोपकर यांचाच असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत चिंचणी पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,  येथील शंकर खोपकर यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसेच त्यांची स्मरणशक्‍तीही कमी झाली होती. 20 जानेवारी रोजी खोपकर रेणुका मंदिराकडे फिरून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते.

त्यानंतर ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध केली होती. ते सापडत नसल्याने ते गायब झाल्याची तक्रार चिंचणी-वांगी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. दोन महिन्यांनंतर  आज त्यांचा मृतदेह  सापडला. देवराष्ट्रे येथील कृष्णत शिवाजी जाधव यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजुरांना काही तरी कुजल्याचा वास येऊ लागला.त्यांनी शोधाशोध केली असता, तेथे डोक्याची कवटी व काही अवयव सापडले आहेत. शेजारी पडलेल्या वस्तूंवरून हे अवयव शंकर खोपकर यांचेच असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेची फिर्याद मृताची पत्नी सुनीता खोपकर यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.