Tue, Aug 20, 2019 04:13होमपेज › Sangli › गुंड बाळू भोकरे टोळीकडून एकावर हल्ला

गुंड बाळू भोकरे टोळीकडून एकावर हल्ला

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

सराईत गुंड बाळू भोकरे याच्यासह पाच जणांच्या टोळीने मिलिंद प्रकाश चिनके (वय 21, रा. गणेशनगर भोईराज हौसिंग सोसायटी) याच्यावर सोमवारी खुनी हल्ला केला. तलवारीचे वार करीत रिव्हॉल्व्हरने धमकावले. पन्‍नास हजार रुपयांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची फिर्याद मिलिंदने सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बाळू भोकरे, धीरज आयरे, धीरज कोळेकर, अक्षय शिंदे आणि एका अनोळखी व्यक्‍तीविरोधात खुनी हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे, मारहाण, दहशत माजवणे, रिव्हॉल्व्हरने धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी धीरज बाबासाहेब कोळेकर (वय 48, रा. गणेशनगर) याला अटक केली असून इतरांचा शोध पोलिस घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : भोकरे याने मिलिंद याच्याकडे काही दिवसांपूर्वी 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मिलिंदने  त्याला दाद दिली नाही. तो सोमवारी दुपारी बाळू भोकरे याच्या कार्यालयापासून जात असताना अक्षय आणि धीरजने त्याला  पकडले. अक्षयने त्याच्याजवळ असलेल्या तलवारीने हल्ला केला. बाळू भोकरे याने रिव्हॉल्व्हरने तोंडावर फटके मारत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मिलिंदला जखमी अवस्थेत उपचारासाठी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. पोलिसांंनी त्याचा जबाब घेतल्यानंतर भोकरेसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी धीरज कोळेकर याला अटक केली. मात्र अन्य चार संशयित फरारी आहेत.  पोलिस त्यांचा ठिक-ठिकाणी शोध घेत आहेत. पोलिसांनी भोकरेच्या घरावरही छापा टाकला. मात्र भोकरे मिळाला नाही.