Wed, Apr 24, 2019 16:40होमपेज › Sangli › महापालिका काँग्रेसमुक्‍त  करा : पालकमंत्री देशमुख

महापालिका काँग्रेसमुक्‍त  करा : पालकमंत्री देशमुख

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:45AMसांगली : प्रतिनिधी

गेल्या 20 वर्षांत भ्रष्टाचाराने शहराचे वाटोळे करणार्‍यांना हटवून महापालिका काँग्रेसमुक्‍त करा, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. येथील कच्छी जैन भवनमध्ये भाजप इच्छुकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, कोल्हापूरचे बाबा देसाई, पक्षनिरीक्षक रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, सौ. भारती दिगडे, शरद नलावडे, श्रीकांत शिंदे, राजाराम गरुड आदी उपस्थित होते.

ना.देशमुख म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे भाजप हा उत्तम पर्याय जनतेने स्वीकारलाच आहे. त्याच जोरावर भाजप ‘सिक्स्टी प्लस’ जाणारच. हे ध्येय गाठण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली पाहिजे. 

ते म्हणाले, निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाराजीचा सामना प्रत्येकालाच करावा लागणार , हे उघड आहे. जर  एखाद्याला उमेदवारी मिळाली तर त्याने अन्य इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी  प्रयत्न करावेत. ती दूर झाली, तर तुम्ही निवडणूक जिंकाल यात शंका नाही.देशमुख म्हणाले, पक्षातील निष्ठावंत आणि नव्याने आलेल्यांत मतभेद आहेत. अर्थात नव्याने येणार्‍यांनी जुन्या कार्यकर्त्यांना तेवढाच मान-सन्मान दिला पाहिजे. नाराज लोकांना पटविण्याचे कौशल्य उमेदवाराने आत्मसात केले तरच तुम्हाला जनतेला पटविता येईल.

ते म्हणाले, काँग्रेसमुक्त देश आणि राज्य केल्यानंतर आता काँग्रेसमुक्त महापालिका करण्यासाठी जनतेने साथ द्यावी. गेल्या वीस वर्षांत महापालिकेतील भ्रष्ट आणि निष्क्रीय कारभाराने जनता अक्षरश: त्रस्त झाली  आहे. त्यामुळे जुन्या-नव्याने पक्षात आलेल्या लोकांनी गप्प न राहता या सर्व भानगडी बाहेर काढव्यात. जनतेनेही काँगे्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी लोकांचे किती ऐकायचे, याचा विचार करावा.

बॅगा घेऊनच ठाण मांडू!

ना. पाटील म्हणाले, आता निवडणुकीसाठी मी पुन्हा दि. 20 जुलैनंतर येणार आहे. अर्थात मी व सुभाष देशमुख महापालिका क्षेत्रात आमच्या साहित्याच्या बॅगा घेऊनच ठाण मांडणार आहोत. मुख्यमंत्रीही येत्या  दि.27 किंवा दि. 28 जुलैला सभेसाठी येतील.

खासदार पाटील म्हणाले, माझ्या अनुपस्थिती आणि नाराजीबद्दल अनेकदा चर्चा केली जात आहे. वास्तविक पक्षाने आणि जनतेने मला भरपूर दिले आहे. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही. नेतृत्व जी जबाबदारी देईल त्याप्रमाणे कामाला लागलो आहे.  ते म्हणाले, व्यक्तीद्वेष जागा झाला तर त्याचा फटका पक्षाला बसत असतो. त्यामुळे या गोष्टीचे भान आम्ही ठेवले आहे. उमेदवारांनीही ठेवावे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि बेबंदशाही मोडीत काढण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वजण कामाला लागूया. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय आता थांबायचे नाही.

आमदार गाडगीळ म्हणाले,  केलेल्या कामाबद्दल मी कधीही बोलत नाही. तरीही आता बोलण्याची वेळ काँग्रेसने आणली आहे. ज्या 70 एमएलडी प्रकल्पाचे काँग्रेस-राष्ट्रवादीने उद्घाटन केले. त्याच्या पूर्णत्वासाठी मीच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून 36 कोटी रुपये मिळवून दिले होते. जनतेने भाजपला सत्ता द्यावी. आम्ही  सांगली, मिरज, कुपवाड शहरांचा चेहरा-मोहरा बदलू.

आमदार खाडे म्हणाले, महापालिकेत इतके दिवस आम्ही लक्ष घालत नसल्याबद्दल टीका होत होती. पण आता लक्ष द्यायला सुरुवात केल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या पोटात गोळा उठला आहे. आघाडी करण्यासाठी त्यांची जी धडपड सुरू आहे.  त्याला भाजपची वाढलेली ताकद कारणीभूत आहे. दिनकर पाटील म्हणाले, गेल्या वीस वर्षांत महापालिकेने भ्रष्टाचाराशिवाय काहीही पाहिले नाही.  भ्रष्टाचाराची बजबजबुरी करून अनेक योजना, विकासकामांचे वाटोळेच केले आहे.   मुन्ना कुरणे, माजी महापौर विवेक कांबळे, सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, धीरज सूर्यवंशी, महादेव कुरणे, सुयोग सुतार आदी उपस्थित होते.