Tue, Jan 22, 2019 14:28
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › बनावट घोषणापत्र करून फसवणूकः एकावर गुन्हा 

बनावट घोषणापत्र करून फसवणूकः एकावर गुन्हा 

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 11:13PMमिरज : शहर प्रतिनिधी 

बनावट घोषणापत्र तयार करून जमीन विक्री केल्याने व त्यातून शासनाची फसवणूक  केल्याप्रकरणी दत्तात्रय मुरलीधर शिंदे (रा. समतानगर मिरज) यांच्यावर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात 
आला. 

याबाबत सुनील शशिकांत इंगळे या सहनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात  तक्रार दिली आहे. विश्रामबागच्या पोलिस लाईनमध्ये राहणारे शंकर आनंदा काळे यांनी  शिंदे यांना दि. 11 नोव्हेंबर 2006 रोजी जमिनीचे वटमुखत्यार पत्र दिले होते. त्यानंतर काळे हे मरण पावले. मात्र काळे यांचा मृत्यू झालेला असतानाही शिंदे याने बनावट घोषणापत्र तयार केले. त्यावरून त्यांनी जमीन शारदा भारत मद्रासी  (रा. विश्रामबाग) यांना विकली. हा खरेदी दस्त मिरजेतील सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करण्यात आला. 

तेथे शिंदे याने ते बनावट घोषणापत्र जोडले. त्यामुळे त्याने शासनाची व जमीन खरेदी करणार्‍या व्यक्तीची फसवणूक केली, अशी तक्रार आहे.