Sun, Feb 17, 2019 09:23होमपेज › Sangli › चार अट्टल चोरट्यांना अटक

चार अट्टल चोरट्यांना अटक

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चार अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून सासवड (पुणे) येथील चोर्‍या उघडकीस आल्या आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीचे सात एलईडी जप्त करण्यात आले आहेत. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सचिन तानाजी मोरे (वय 26, रा. काळोशी, जि. सातारा), संजय ऊर्फ दत्तात्रय किसन राठोड (वय 38, मूळ रा. कवठेतांडा, जि. सोलापूर, सध्या रा. सैदापूर, जि. सातारा), विक्रम ऊर्फ विक्रमसिंह ऊर्फ विकी रामदास चव्हाण (वय 33, रा. मुळशी, जि. पुणे), गुंडाराम ऊर्फ गुंडा ऊर्फ तारासिंग चंद्रसिंग चव्हाण (वय 38, रा. हिंजवडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

मेढा (जि. सातारा) येथील पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली होती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सासवड येथून एलईडी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखांचे सात एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Tags : sangli, Four unidentified, thieves, arrested, sangli news,