होमपेज › Sangli › मिरजेत तीन वेगवेगळ्या अपघातात चार जखमी 

मिरजेत तीन वेगवेगळ्या अपघातात चार जखमी 

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 11:48PM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी 

मिरज शहरात व बेळंकी येथे गेल्या 12 तासांत तीन ठिकाणी झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. रविवारी शहरातील शनी मारुती मंदिरासमोर दोन दुचाकीं (एम. एच.  9 ए सी 3184 व एम एच 10 बी एच 9785) ची धडक झाली. या धडकेत भारत रामचंद्र कांबळे (वय 54, रा. भारतनगर, मिरज) हे जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे. 

दुसरा अपघात सोमवारी सकाळी  शासकीय रुग्णालयासमोर झाला.  कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सारिका अविनाश चंदनशिवे (वय 31), अविनाश अशोक चंदनशिवे (वय 39, रा. अयोध्यानगर, मिरज) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.   तिसरा अपघात तालुक्यातील बेळंकी येथे झाला. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला ठोकरले. या अपघातात दीपक शिवाजी गायकवाड (वय 35, रा. बेळंकी)  जखमी झाले . त्यांना मिरजेच्या खासगी रुग्णालयात  दाखल केले आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाणे अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.