Sat, Jul 20, 2019 13:06होमपेज › Sangli › ‘टीआरपी’साठी जयंत पाटील यांच्यावर टीका

‘टीआरपी’साठी जयंत पाटील यांच्यावर टीका

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:05AMइस्लामपूर : वार्ताहर

आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील स्वत:चा टीआरपी वाढवत आहेत. त्यांनी प्रसिद्धीचा हा उद्योग बंद करावा, असा पलटवार राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी  नगराध्यक्ष पाटील यांच्या वक्तव्याच चांगलाच समाचार घेतला. प्रा. शामराव पाटील म्हणाले,अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांची पात्रता काय?

राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष  विनायकराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील उपस्थित होते. 

शहाजीबापू पाटील म्हणाले,  जयंत पाटील यांनी जर नगराध्यक्ष पाटील यांच्या कॉलेजला विरोध केला असेल तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव का दिले? त्यांना संस्थेत नेऊन वेळोवेळी कार्यक्रम का घेतले? गेल्या 15 वर्षांत आ. पाटील यांच्या बगलबच्यांचाच विकास झाला, असे म्हणत असाल तर तुम्हीही त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते होता. तुमचाही विकास त्यांच्याच माध्यमातून झाला काय? 

ते म्हणाले, जयंत पाटील जर अडवणूक, दबावाचे व इतरांना त्रास देण्याचे राजकारण करीत असते तर जनतेने त्यांना सहा वेळा आमदार म्हणून निवडून दिले असते का? त्यांच्या कामाची पद्धत तालुक्यालाच नव्हे तर राज्याला माहीत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्था पारदर्शीपणे व काटकसरीने चालत आहेत. तुम्हाला एक पाणीपुरवठा संस्थाही  चालविता आली नाही. तुम्ही काय सहकार उभा करणार? 

उपनगराध्यक्ष  पाटील म्हणाले, नगराध्यक्षांनी विकासकामांची दिलेली आकडेवारी चुकीची व दिशाभूल करणारी आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदानाचे 2 कोटी रुपये वगळता एक रुपयाही अनुदान त्यांच्या कार्यकाळात आलेले नाही. नगरपालिकेची ठेव व शिल्लक 52 कोटी हे राष्ट्रवादीच्या काळातीलच आहेत. आधीच मंजूर झालेली रस्त्याची कामे शहरात पूर्ण झाली व सुरू आहेत. प्रा.  पाटील म्हणाले, आमदार पाटील हे कधी कोणावर टीका करत नाहीत. ते  विकासावरच बोलत असतात.