Mon, Feb 18, 2019 00:17होमपेज › Sangli › सांगलीत अन्नातून विषबाधा : सख्या भावंडांचा मृत्यू

सांगलीत अन्नातून विषबाधा : सख्या भावंडांचा मृत्यू

Published On: Mar 10 2018 9:31PM | Last Updated: Mar 10 2018 9:31PMतासगाव : प्रतिनिधी

अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे सावळज येथील दोन सख्या भावंडांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखील शिवानंद व्हळकल्ले (वय, ६) आणि श्रावणी शिवानंद व्हळकल्ले (वय, ३) अशी मृत भावंडांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. 
कर्नाटकातील अलकनूर, (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथून मजूरीसाठी येऊन राहिलेल्या कुटूंबातील आहेत. राञी उशीरा तासगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, सुजाता व्हळकल्ले गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मोल मजूरीसाठी सावळज येथे येऊन राहिलेल्या आहेत. शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मजूरीसाठी गेल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास निखील आणि श्रावणी ही भावंडे घरासमोरील अंगणात खेळत होती. अचानकच श्रावणीला उलट्या होऊ लागल्या. ही गोष्ट तिच्या आजीच्या लक्षात आली. शेजाऱ्यांच्या मदतीने आजीने श्रावणीला खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या. परंतू डॉक्टरांनी तिला सांगलीला घेऊन जा असे सांगितले. मात्र, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 

शेजारील मंडळी श्रावणीला उपचारासाठी घेऊन गेले असतानाच तोंडाला फेस येऊन निखीलही उलट्या करु लागला. त्याला उपचारासाठी सावळज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

निखील आणि श्रावणी या दोन्ही भावंडांचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्यामुळेच झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु, नेमके काय खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली हे समजू शकलेले नाही. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.