Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Sangli › सर्वसामान्यांच्या विकासासाठी पाठपुरावा : डॉ. विश्‍वजित कदम

सर्वसामान्यांच्या विकासासाठी पाठपुरावा : डॉ. विश्‍वजित कदम

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 7:16PMतोंडोली : वार्ताहर

पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नूतन आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली. कार्यकर्त्यांनी आपआपसांतील गट-तट, मतभेदांना तिलांजली देत एकत्र काम करण्याचे त्यांनी आवाहनकेले.  तोंडोली येथे आभार दौर्‍यानिमित्त आयोजित जाहीर सभेत डॉ. कदम बोलत होते. माजी उपसभापती विठ्ठल मुळीक, प्रकाश जाधव, सोनहिराचे संचालक लक्ष्मण पोळ, सुनील पाटील, बेलवडेचे उपसरपंच तानाजी तवर, उत्तम मोहिते, महेश कदम उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी  शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक  औद्योगिक आदी क्षेत्रात केलेल्या कामांचा आदर्श ठेवून आपण कार्यरत राहू.  माजी सरपंच विजय मोहिते, ज्येष्ठ नेते शिवाजी मोहिते यांचेही भाषण झाले.