Tue, Nov 13, 2018 10:10होमपेज › Sangli › ‘कर्मवीर’ स्मारकासाठी पाठपुरावा करू : अभिजित पाटील 

‘कर्मवीर’ स्मारकासाठी पाठपुरावा करू : अभिजित पाटील 

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 7:49PMऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मातृभूमीत यथोचित स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही जि. प. चे माजी सदस्य, शिवसेनेचे नेते अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.

सरपंच प्रतिभा बुद्रूक, जि. प. सदस्या सुरेखा जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, माजी पं. स. सदस्य अरविंद बुद्रूक, कर्मवीर वाचनालयाचे सचिव राजेंद्र बुद्रूक यांच्यासह पदाधिकार्‍यांमध्ये  कर्मवीर स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. 

अभिजित पाटील म्हणाले, ऐतवडेसह परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्यासह प्रमुख मंडळींचे शिष्टमंडळ रयत शिक्षण संस्थेस भेट देऊन स्मारकासाठी पाठपुरावा करणार आहे. एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा यासह विविध स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तके, संदर्भग्रंथ तसेच अण्णांचे चरित्र, व्याख्यान, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र, म्युझियम यासारख्या अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त बहुउद्देशीय स्मारक व्हावे. 

जि. प. सदस्या सुरेखा जाधव म्हणाल्या, कर्मवीरांच्या स्मारकासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू. राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड म्हणाले, शिक्षणमहर्षींच्या मातृभूमीत यथोचित स्मारक साकारण्यासाठी गट-तट बाजूला ठेवून स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करूया. तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गायकवाड, एम. के. जाधव, सचिव राजेंद्र बुद्रूक, वर्धमान बुद्रूक, शशिकांत शेटे, ग्रामस्थ उपस्थित होते.