Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Sangli › नागपंचमीत न्यायालय आदेशाचे पालन करा : अपर जिल्हाधिकारी 

नागपंचमीत न्यायालय आदेशाचे पालन करा : अपर जिल्हाधिकारी 

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:50PMसांगली : प्रतिनिधी

बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. मात्र लोकपरंंपरेनुसार, कायद्याचा आदर राखून आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नागरिकांनी  उत्सव साजरा करावा,  असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आज   केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमीच्या आयोजनासाठीच्या बैठकीत ते बोलत होते.  उपवनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. भारतसिंह हाडा, वाळवा - शिराळ्याचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे,   मानद वन्यजीवसंरक्षक तथा जनहित याचिकाकर्ते अजित पाटील, व्याघ्र कक्ष समितीचे  प्रदीप सुतार आदि उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, नागरिकांनीही जिवंत नागांची पूजा करू नये.  शोभायात्रेमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी शिराळ्यामध्ये नागमंडळांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.  

पोलिस उपअधीक्षक (गृह) महेश्वर रायकर म्हणाले, शिराळ्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे गतवर्षी एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. यावर्षीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. यावर्षी 4 पोलिस उपअधीक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 480 पोलिस , 50 वाहतूक पोलिस, 60 महिला पोलिस , 20 व्हिडीओग्राफर, 30 वाहने आणि 11 ध्वनीमापक यंत्रे असा चोख बंदोबस्त पोलिस विभागातर्फे ठेवण्यात आला आहे.शिराळ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी नागपंचमी उत्सव शांततेत पार पाडू, अशी ग्वाही दिली.