होमपेज › Sangli › संततधार पावसाने वारणा नदीला पूर

संततधार पावसाने वारणा नदीला पूर

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 9:56PMशिराळा : प्रतिनिधी

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र    वारणावती येथे आठ दिवस सतत  पाऊस सुरू आहे.  आज सकाळपर्यंत वारणावती येथे  54 मिलीमीटर पावसाची नोंद  झाली.  वारणा नदीस पूर आला असून सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. काखे- मांगले, मांगले- सावर्डे, कोकरुड- रेठरे, चरण- सोंडोली, आरळा- शित्तूर या मागार्ंवर वाहतूक बंद झाली आहे. चांदोली धरण व अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसाने वारणा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. नदीकाठावरची पिके पाण्याखाली गेली आहेत. 

पावसाने रस्ते वाहून गेले आहेत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.   मोरणा धरण भरले आहे. सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. करमजाई, शिवणी, अंत्री, रेठरे धरण या धरणांच्या पाण्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील 50पाझर तलाव भरले आहेत.  शेतकर्‍यांची  पिकांच्या भांगलणीची धांदल सुरू असतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे  सर्वच कामे खोळंबलीआहेत.  तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. 

तालुक्यातील मुख्य पीक भात आहे. धूळवाफेत भात पिकाची पेरणी करण्यात आली आहे. भात पिकांच्या वाढीस पाऊस उपयुक्त झाला आहे. तालुक्याचे तालुक्याचे खरीप हंगामातील पिकांचे क्षेत्र 22350 हेक्टर आहे. त्यापैकी भाताचे क्षेत्र 12297हेक्टर आहे.  भाताची 100टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. भात रोपे लागणीची कामे सुरू झालेली  आहेत.  सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका या पिकांच्या पेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. आंतर मशागतीची कामे पावसामुळे थांबली आहेत.  काही शेतकर्‍यांची उसाची आडसाली लागण पावसामुळे खोळंबली आहे. सरीवर भुईमूग, सोयाबीन टोकणीची  व  ऊस भरणीची कामे  पूर्ण झाली आहेत. तालुक्यातील सर्वच मंडल क्षेत्रात पाऊस झाल्याने शेतकरीसमाधान व्यक्त करीत आहेत.  तालुक्यात मंडल क्षेत्रात पडलेला आजचा व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये असा : चरण16 (1029), कोकरुड 15(  806), शिरशी20 (677 ), शिराळा 20 (524 ), सागाव24 (586), मांगले 21 ( 501 ).

मोरणा धरण भरले;पाणी  बाहेर

तालुक्यातील मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.  दुपारी चार वाजता धरण भरले. तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे.शिरसी मंडल क्षेत्रात अतीवृष्टी सुरू आहे.त्यामुळे धरण लवकर भरले.  गेल्या वर्षी धरण जुलैअखेर भरले होते.  यावेळी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातच भरले आहे.शिराळा शहर, रेठरे, तसेच औद्योगिक वसाहतींचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मोरणा धरण लाभ क्षेत्रातील तडवळे, उपवळे, बिऊर, मांगले, पाडळी, शिराळा भाटशिरगाव, पवारवाडी  येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

चांदोली धरण 84 टक्के भरले

शिराळा : प्रतिनिधी  चांदोली धरण टक्के 84. 44 टक्के भरले आहेे. धरणात 29.05 टीएम सी पाणी साठा झाला आहे. धरण परिसरात  संततधार चालू आहे. आजपर्यंत  1717 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  धरणाचे दरवाजे रविवार पासून उघडण्यात आले आहेत. चार दरवाजांतून 13055 क्युसेकने विसर्ग होत आहे. एकूण विसर्ग 13986क्युसेक आहे.