Thu, Apr 25, 2019 17:34होमपेज › Sangli › पाच पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

पाच पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुणे दौर्‍यावेळी संरक्षणासाठी नेमलेला एकही पोलिस कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत न गेल्याने पाचजणांना निलंबित करण्यात आले.पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले. 

पोलिस कॉन्स्टेबल ए.के. कोळेकर (नेमणूक सांगली शहर पोलिस ठाणे), टी.बी. कुंभार (विश्रामबाग पोलिस ठाणे), एस.ए.पाटील (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), व्ही.एस. पाटणकर, ए.एस.शेटे (दोघेही पोलिस मुख्यालय) अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत

कोरेगाव-भीमा घटनेप्रकरणी दलित संघटनांनी 3 जानेवारीला बंदचे आवाहन केले होते. बंदवेळी शहरातील मारुती चौकात भिडे यांची प्रतिमा असलेला फलक फाडण्यात आला होता. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही तिथे जमा झाले होते. दोन्ही गट आमने-सामने आले होते. मात्र, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दोन्ही गटांना पांगविले होते.

या घटनेनंतर भिडे यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यांना पोलिसांचे संरक्षण होते. यासाठी सांगली शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिसांची नियुक्‍ती करण्यात आली होती.दि. 20 एप्रिल रोजी संभाजी भिडे कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलिस त्यांच्यासोबत गेले नव्हते. ते पोलिस त्यांच्यासोबत न गेल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पाचही जणांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. 

Tags : Sangli, Sambhaji Bhide,  protection, Pune tour, Five police, constables, suspended,