Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Sangli › रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्लाप्रकरणी पाचजणांना अटक

रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्लाप्रकरणी पाचजणांना अटक

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 11:51PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे समर्थक आणि रयत क्रांती संघटनेच कार्यकर्ते गणेश हौसेराव शेवाळे (वय 36, रा. बहे) यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी बुधवारी रात्री पाच संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली.  त्यांना न्यायालयाने  सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अभिजित जयवंत खांबे (वय 29), अजित हणमंत पाटील (वय 23), गणेश साईनाथ पाटील (वय 21), सिद्धू करबसाप्पा लालसिंगे (वय 25, सर्व रा. इस्लामपूर), विक्रांत बापू क्षीरसागर (वय 23, रा. ताकारी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

शेवाळे मंगळवारी रात्री सांगली-पेठ रस्त्यावरील आष्टा नाक्याजवळील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेवण करून ते बाहेर आले. त्यावेळी काहीजणांनी त्यांना मारहाण केली होती. रक्तबंबाळ अवस्थेत गणेश शेवाळे यांना तातडीने  इस्पितळात दाखल केले होत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेवाळे यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली.  पोलिसांनी बुधवारी रात्री पाचजणांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोेखे अधिक तपास करीत आहेत.