Wed, Feb 20, 2019 10:36होमपेज › Sangli › सांगलीत एकाचे घर पेटविले

सांगलीत एकाचे घर पेटविले

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:19AMसांगली : प्रतिनिधी

कर्नाटकातील बागलगुंटी येथील दरोड्याप्रकऱणी ख्वाजा कॉलनीतील तीन महिलांसह आठजणांना अटक करण्यात आली आहे. एकाच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केल्याच्या रागातून एकाने घर पेटवून दरवाजा आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या. बुधवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुलतान ऊर्फ सादिक ऊर्फ कोतू सिराज इराणी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र चौधरी (वय 43, रा. वडर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. येथील सर्फराज इराणीच्या खूनप्रकरणात फिरोज इराणी त्याची पत्नी महाराणी, मुलगी मरियम, जैनबी सध्या कारागृहात आहेत. या खून प्रकरणात अडकविल्याने फिरोजच्या नातेवाईकांनी कर्नाटक पोलिसांना खोटी माहिती देऊन संशयित सुलतानची आई नुरी, बहीण फिरदोस, मावस भाऊ महम्मद, उमर यांना अटक करण्यात आल्याचा सुलतानचा गैरसमज झाला होता. 

त्यामुळे बुधवारी त्याने चिडून फिरोज इराणी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर कापडाचे पेटते बोळे घरात टाकले. यामुळे घरातील सोफासेट, खुर्च्या, पडदे जळून खाक झाले आहेत. यामध्ये त्यांचे पंचवीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. इराणी यांनी घराची देखभाल करण्याची जबाबदारी प्रकाश चौघरी यांच्यावर दिली आहे. बुधवारी ते घराची पाहणी करायला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत इराणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.