Sun, May 26, 2019 11:22होमपेज › Sangli › संपावरील कर्मचार्‍यांना मंत्रालयातून चर्चेचे निमंत्रण

संपावरील कर्मचार्‍यांना मंत्रालयातून चर्चेचे निमंत्रण

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानकडील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. अर्थमंत्री, आरोग्यमंत्री व कंत्राटी अधिकारी-कर्मचारी महासंघ यांची मंगळवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. 

खासदार संजय पाटील यांनी सोमवारी जिल्हा परिषदेजवळ आंदोलनस्थळी भेट दिली. कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे. आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्र्यांना तातडीने कळविल्या जातील, असे खासदार पाटील यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले. 

आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण खरमाटे, पी. एन. काळे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, महासंघाचे नेते डॉ. विनायक पाटील, हनुमान क्षीरसागर, डॉ. विशाल नलवडे, सुधाकर पाटील, उज्ज्वला मोटे, डॉ. संतोष पाटील व कंत्राटी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. 

डॉ. विनायक पाटील म्हणाले, आठ ते दहा वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. यापुढे कंत्राटी नियुक्ती सहा महिन्यांसाठी असणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर कामावर आधारित मूल्यांकन होणार आहे. मूल्यांकनाची गुणपध्दत जाचक आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांची पिळवणूक होणार आहे. 

कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांना सेवेत कायम करावे. समान काम, समान वेतन मिळावे यासाठी जिल्ह्यात 550, तर राज्यात 17 हजार कंत्राटी अधिकारी, कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी आहेत. 

Tags : sangli, Finance Minister, Health Minister, Contracting Officer-Employees, Federation, Tuesday Meeting, Mantralaya,