Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Sangli › अखेर प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर

अखेर प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:32PMसांगली ः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यावर अखेर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेने या मतदार याद्या ऑनलाईन महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर झाल्या आहेत. त्यावर हरकती-सूचनांसाठी 18 जूनपर्यंत मुदत आहे. शिवाय, अंतिम मतदार याद्या 30 जून रोजी निश्‍चित होणार असून, 2 जुलै रोजी मतदार केंद्रनिहाय याद्या जाहीर होतील.

महापालिका प्रचाराची  रणधुमाळी सुरू आहे. आरक्षण, प्रभागरचना जाहीर झाली आहे. सर्वपक्षीय इच्छुकांच्या अर्जांद्वारे चाचपणी सुरू आहेत. इच्छुकांनी पक्ष निश्‍चित नसला तरी व्यक्तिगत प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, यामध्ये प्रभागनिहाय मतदार याद्या निश्‍चितीची प्रक्रियाही महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून सुरू होती. 

प्रशासनाने नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांसह मतदार याद्या निश्‍चित करून निवडणूक आयोगाकडे पाठविल्या होत्या. त्या 5 जून रोजी निश्‍चित होणे गरजेचे होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम लांबणीवर गेला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रारूप याद्यांवर शिक्कामोर्तब करून त्या जाहीर केल्या.

यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात एकूण 4 लाख 23 हजार 366 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 15 हजार 89 पुरुष तर 2 लाख 8 हजार 540 स्त्री मतदार तर 37 इतर मतदार आहेत. सर्वाधिक 26 हजार 530 मतदार असलेला प्रभाग क्रमांक 16 आहे. तर सर्वात कमी 14 हजार 516 मतदार असलेला सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक 13 आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवहणूक आयोगाच्या आदेशा नुसार गुरूवारी प्रभाग निहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. या याद्यावर हरकती घेण्यासाठी 18 जून पर्यंत मुदत आहे. 30 रोजी प्रभाग निहाय अंतीम मतदार याद्या जाहीर होणार आहेत. तर 2 जुलै रोजी मतदान केंद्र व मतदान केंद्र निहाय मतदार यांनी जाहीर होणार आहे.