Wed, May 22, 2019 16:49होमपेज › Sangli › सांगलीत गावठी कट्टा जप्त

सांगलीत गावठी कट्टा जप्त

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 17 2017 12:25AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील पटेल चौक परिसरात राहणार्‍या युवकाकडून पन्नास हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय दत्तात्रय खंडागळे (वय 21, रा. पटेल चौक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खंडागळेकडे गावठी कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गावठी कट्टा हनुमाननगर येथील एका शाळेच्या पाठीमागे लपविल्याचे सांगितले. 

पथकाने त्याला तेथे नेऊन कट्टा जप्त केला. त्याच्यावर बेकायदा शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.