होमपेज › Sangli › गोटखिंडी ग्रामस्थांना भयमुक्‍त करा : जयंत पाटील

गोटखिंडी ग्रामस्थांना भयमुक्‍त करा : जयंत पाटील

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:50PMयेडेनिपाणी : वार्ताहर

आमदार जयंत पाटील यांनी गोटखिंडी गावास भेट दिली. बिबट्याच्या वावराने भीतीग्रस्त ग्रामस्थांना दिलासा दिला. त्यांनी उपस्थित वनअधिकार्‍यांशी चर्चा केली. वरिष्ठ वनअधिकार्‍यांशी संपर्क करून लवकरात-लवकर या बिबट्याला हुसकावून लावून ग्रामस्थांना भीतीमुक्त करण्याच्या सूचना केल्या.

आ. पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी गोटखिंडीस भेट दिली. यावेळी संचालक ए. टी. पाटील, सरपंच विजय लोंढे, वन क्षेत्रपाल तानाजी मुळीक, वनसंरक्षक एस. एन. मुल्ला, वनपाल मिलिंद वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सांगलीचे उपवन संरक्षक भारतसिंह हाडा यांच्याशी संपर्क करून तातडीने हालचाली करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी दिल्या.  वनक्षेत्रपाल  तानाजी मुळीक यांनी सांगितले की, या बिबट्याच्या ठश्यावरून हा अडीच-तीन वर्षांचा बिबट्या असून हा बिबट्या शिकार करणार नाही. त्याला लवकरात लवकर हुसकावून लावणार आहोत.यावेळी संजय पाटील, सुभाष शिंगटे, विनायक पाटील, सागर डवंग, धैर्यशील थोरात, लालासाहेब थोरात, ग्रामपंचायत सदस्य पोपट डवंग, दिलीप मदने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.