Sun, Jan 20, 2019 17:35होमपेज › Sangli › सैल वीजतारांमुळे दुर्घटनांची भीती

सैल वीजतारांमुळे दुर्घटनांची भीती

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 7:59PMबागणी : प्रतिनिधी

ताण सैल होऊन धोकादायक बनलेल्या वीजतारांमुळे बागणीसह भागात वाढत्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत वीजवितरणच्या संबंधित अधिकार्‍यांना वारंवार कळवूनदेखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने कमालीचा संताप व्यक्त होतो आहे.

बागणीसह नजीकच्या विस्तारीत भागात तसेच परिसरात बहुतेक सर्वच ठिकाणी वीजवितरणच्या तारांचा ताण कमी झाला आहे. यामुळे या सैल झालेल्या तारा इमारतींच्या अगदी छताला घासू लागल्या आहेत. यातून अनेकवेळा दुर्घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका बांधकामावर काम करत असताना खाली आलेल्या तारांमधून विजेचा जोरदार धक्का बसल्याने एका मजुराच्या जीवावर बेतले, मात्र सुदैवाने दुर्घटना टळली. मात्र अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. 

राज्यमंत्री खोत यांचा इशारा बेदखल

येलूर येथे दुर्घटना घडल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वीजवितरणच्या अधिकार्‍यांना तातडीने अशा धोकादायक वीजतारांना सर्र्वेे करुन त्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या, तसेच हयगय केल्यास कारवाईचा कडक शब्दात इशारा दिला होता. मात्र अधिकार्‍यांनी राज्यमंत्री खोत यांचा इशारा देखील बेदखल केला असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.