Fri, Jul 19, 2019 18:22होमपेज › Sangli › दुचाकी-टेम्पो अपघातात विट्यात पिता-पुत्र ठार 

दुचाकी-टेम्पो अपघातात विट्यात पिता-पुत्र ठार 

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:53AM

बुकमार्क करा

विटा : वार्ताहर

दुचाकी आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक होऊन  पिता-पुत्रांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील बळवंत महाविद्यालयाजवळ घडला. धोंडिराम ज्ञानू साठे (वय 36) व धीरज धोंडिराम साठे (वय 12, दोघे रा. विटा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विटा पोलिसांत डॉ. रजपूत यांनी वर्दी दिली.  

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : येथील धोंडिराम साठे हे मुलाला घेऊन दुचाकी (एमएच10 सीजे 556) विट्यातून पंचशीलनगरकडे निघाले होते.येथील बळवंत महाविद्यालयाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खानापूरकडून विट्याकडे पवनचक्की कंपनीचे कामगार घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर (एम.एच.10 ए.डब्ल्यू 5095 ) यांच्यात समोरासमोर धडक झाली. 

या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चक्‍काचूर झाला आहे. या अपघातात धोंडीराम साठे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  धीरज हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. परंतु प्रकृती बिघडल्याने  पुढील उपचारांसाठी सांगलीला नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने पलायन केले आहे.