Sat, Nov 17, 2018 09:59होमपेज › Sangli › कासेगाव येथे वडिलाने केला मुलीवर बलात्कार

कासेगाव येथे वडिलाने केला मुलीवर बलात्कार

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:15AMबांबवडे : वार्ताहर

वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे एकाने स्वतःच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयिताच्या पत्नीनेच पतीविरुद्ध कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयिताला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.  न्यायालयाने त्याला 22 फेबुवारीपर्यंत पोलिस कोठडी  दिली.

संशयित कासेगाव येथे शेतमजुरीचे काम करीत होता. पाच महिन्यांपूर्वी पत्नी मजुरी करायला गेली असता  त्याने  मुलीवर बलात्कार केला अशी तक्रार आहे. शुक्रवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या मुलीच्या आईने पतीविरुद्ध फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक पवन चौधरी, सहायक फौजदार संध्या पारधी तपास करीत आहेत.