होमपेज › Sangli › अनेक खातेदार कर्जमाफीपासून वंचित

अनेक खातेदार कर्जमाफीपासून वंचित

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 9:42PMइस्लामपूर : वार्ताहर

राष्ट्रीयीकृत बँकांतून पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याची कोणतीही माहिती संबंधित बँकांकडून खातेदारांना मिळत नसल्याने कर्जदार शेतकरी संभ्रमात आहेत. गेल्या वर्षांपासून कर्जमाफी योजनेचा घोळ सुरू आहे. अद्यापही या योजनेची पूर्ण अंमलबजावणी होवू शकलेली नाही. सहकारी सोसायट्यांची सहावी ग्रीन लिस्ट आली तरीही राष्ट्रीयकृत बँकांतून मात्र लाभार्थ्यांची पहिलीच लिस्ट   दाखविली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांतून पीक कर्ज घेतलेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. 

शासनाने ज्या - ज्यावेळी शेतकर्‍यांची कर्जाची माहिती मागविली. त्या-त्यावेळी सहकारी सोसायट्या, जिल्हा बँकांनी ती शासनाला सादर केली. मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी ही माहिती वेळेवर न दिल्याने अनेक कर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याची चर्चा आहे. तर या बँकांतून चौकशी करण्यासाठी गेलेल्यांना  माहिती दिली जात  नसल्याचा आरोप होतो आहे.