Thu, Jun 04, 2020 03:11



होमपेज › Sangli › शेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन

शेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा






सांगली : प्रतिनिधी

शेतीमाल खरेदी केंद्रावर उडीद व मूग एकरी दोन क्विंटलच खरेदी केला जात असल्यावरून शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उडीद फेकून आंदोलन करून संताप व्यक्त केला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी,  जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांना निवेदन दिले. 

शेतकरी संघटना राज्य सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले, पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडी प्रमुख शितल राजोबा, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे रावसाहेब दळवी, शेतकरी संघटना जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे, कामगार आघाडीचे मोहन परमणे, राजू माळी, बाशेखान मुजावर, अण्णा पाटील, वसंत भिसे, भगवान पाटील व शेतकर्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालाने उडीद, मुग या शेतीमालाचे  काढलेले नजरअंदाजी एकरी 2 क्विंटल उत्पादन चुकीचे आहे. बागायती पट्ट्यात एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन होते. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला सर्व शेतीमाल खरेदी केंद्रावर खरेदी करावा. एकरी उत्पादनाची अट लादू नये, अशी मागणी करण्यात आली.  दरम्यान शेतकरी संघटनेच्या मागणीकडे ‘पणन’चे लक्ष वेधले जाईल. निवेदन शासनाकडे पाठविले जाईल, जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी आंदोलकांना सांगितले.