Sun, Jul 21, 2019 10:35होमपेज › Sangli › बनावट नोटांप्रकरणी एटीएसची मदत घेणार : नांगरे-पाटील

बनावट नोटांप्रकरणी एटीएसची मदत घेणार : नांगरे-पाटील

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:34AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत बनावट नोटा खपविणार्‍या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास केला जाईल. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसची मदत घेण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नांगरे-पाटील म्हणाले, सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटा खपविणार्‍या एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यातील सूत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत  असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सांगली पोलिसांचे एक पथक लवकरच तपासासाठी पश्‍चिम बंगालला पाठविण्यात येणार आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

यामध्ये देशविघातक शक्‍ती कार्यरत असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचीही मदत घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा गतीने तपास करून सूत्रधाराला अटक करू, असेही नांगरे-पाटील यांनी  सांगितले.