Thu, Jul 18, 2019 02:55होमपेज › Sangli › उमेदवारांची ‘कुंडली’ मतदारांपर्यंत पोहोचवा

उमेदवारांची ‘कुंडली’ मतदारांपर्यंत पोहोचवा

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 21 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

उमेदवारांची शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्‍वभूमीबरोबरच सर्वच कुंडली मतदारांपर्यंत पोहोचवावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्‍त आर. जे. एस. सहारिया यांनी अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सर्वच 451 उमेदवारांचा लेखाजोखा प्रभागातील प्रत्येक भागात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी तसेच आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी 20 प्रभागांत 78 जागांसाठी तब्बल 451 उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनानेही यासाठी जय्यत तयारी केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत तब्बल 544 मतदान केंद्रे उभी केली आहेत.  सर्व मतदान केंद्र आदर्श करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे. यामध्ये कडक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. अगदी आयकर विभागाचाही पक्षीय आणि
उमेदवारांच्या हालचालीवर वॉच ठेवला आहे. 

3खेबुडकर म्हणाले, एकूणच प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्त  सहारिया सांगली दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वच यंत्रणेची बैठक घेऊन आढावा घेतला.  यामध्ये निवडणूक भयमुक्‍त आणि पारदर्शी पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.ते म्हणाले, श्री. सहारिया यांच्या आदेशानुसार सर्वच उमेदवारांची   व्यक्‍तिगत माहिती जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे. ती प्रसिद्धही करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वय, गुन्हेगारी पार्श्वभूमी, दोन वषार्ंपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकेल अशा प्रलंबित प्रकरणाची संख्या, कारावास मिळालेल्या प्रकरणांची संख्या,  थकित रक्कमेचा हिशेब आदींचा समावेश आहे. उमेदवारांच्या स्थावर व जंगम मालमत्ता याबाबतची माहिती प्रत्येक भागात  प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी उमेदवारांची निवड करताना ही सर्व माहिती मतदारांना व्हावी, हा राज्य निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. यानुसार याची अंमलबजावणी होणार आहे.