Thu, Apr 25, 2019 23:42होमपेज › Sangli › शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

सरकार समाजातील विविध घटकांसाठी  कल्याणकारी योजना राबवतेे. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा.  त्यासाठी युवा माहिती दूत अ‍ॅप उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास  पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केला.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत अ‍ॅपच्या   उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 

खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम- पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत,   सुहेल शर्मा, महापालिका आयक्‍त रवींद्र खेबुडकर,   जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर,   महाविद्यालयांचे प्राचार्य  विद्यार्थी - विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.    ना. देशमुख म्हणाले,  शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवताना युवकांना समाजाचे प्रश्‍न समजतील. सामाजिक प्रश्‍नांवर तोडगा काढत असताना त्यांच्यात सामाजिक जाण  निर्माण होईल.  समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद युवा वर्गामध्ये आहे. महाविद्यालयांनी शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आठवड्यातून एक तास ठेवावा. 

असे आहे युवा माहिती दूत अ‍ॅप 

युवा माहिती दूत हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.   यावर नोंदणी केलेले माहिती दूत हे लाभार्थींना अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन करतील. त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देतील. या अ‍ॅप्लिकेशनला शासनाचे इतर अ‍ॅप्लिकेशनदेखील जोडण्यात आल्याने सर्व योजना, उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी मिळणे शक्य होईल. सहभागी माहितीदूत  50 लाभार्थींच्या घरी जाऊन  योजनांची माहिती देतील.  त्यांना शासनाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येईल.   त्यांना डिजीटल प्रमाणपत्र   मिळेल.