Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Sangli › आर.आर आबांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न (Photo)

आर.आर आबांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न (Photo)

Published On: Dec 10 2017 8:08AM | Last Updated: Dec 10 2017 8:13AM

बुकमार्क करा

सांगली : पुढारी ऑनलाईन

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील यांचा उद्योजक आनंद थोरात यांच्या बरोबर काल(शनिवार दि.९) साखरपुडा झाला. आर आर पाटील यांच्या तासगाव मधील अंजनी गावी हा साखरपुडा समारंभ पार पडला.

पुणे येथील आनंद थोरात यांच्याशी स्मिताचा विवाह गेल्या महिन्यात निश्‍चित झाला होता. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण केले असून सद्या ते पुण्यामध्ये व्यवसाय संभाळत आहेत. 

या साखरपुडा समारंभाला मोठी गर्दी झाली होती. स्मिता पाटील आणि आनंद थोरात हे १ मे २०१८ ला विवाहबंधनात अडकणार आहेत.


Image may contain: 5 people, people smiling

Image may contain: 4 people, people smiling, people standing