Thu, Jul 18, 2019 10:56होमपेज › Sangli › अहिल्यानगर रस्त्यामध्येच विजेचा खांब 

अहिल्यानगर रस्त्यामध्येच विजेचा खांब 

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 7:59PMसांगली : वार्ताहर

अहिल्यानगर - कुपवाड रस्त्यावर विशेषत: आंबा चौक येथील विजेचे, टेलिफोनचे खांब रस्त्याच्या मध्ये येत असल्याने या भागात ठिकठिकाणी रस्ता अरूंद बनला आहे. या खांबांची अडचण होत असल्याने हे खांब काढून टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.   शासनाच्या विशेष निधीतून साडे तीन कोटी रुपये खर्चून  कुपवाड रस्ता केला जात आहे. यातून या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी गटारी केल्या जात आहेत. मात्र या गटारी रस्त्याच्या कडेला न बांधता बाजूने काही अंतर सोडून रस्त्याच्या मध्येच बांधल्या जात आहे. या नवीन बांधण्यात येत असलेल्या वेड्यावाकड्या गटारींमुळे रस्ता काही ठिकाणी अरूंद होत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याकडेच्या दोन्ही गटारीच्या मध्येच अनेक विजेचे खांब व टेलिफोनचे खांब आहेत. आंबा चौकात गटारीसाठी जेसीबी मशीनने चर खोदत असताना एक विजेचा खांब एका बाजूला झुकला आहे. हा धोकादायक खांब पुन्हा सरळ करून मजबूत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवराज मंडळाचे संस्थापक शामराव वाघमोडे यांनी दिला आहे.