होमपेज › Sangli › माडग्याळसह आठ गावांचा ‘म्हैसाळ’मध्ये समावेश शक्य

माडग्याळसह आठ गावांचा ‘म्हैसाळ’मध्ये समावेश शक्य

Published On: Jun 28 2018 1:35AM | Last Updated: Jun 27 2018 10:42PMयेळवी  : वार्ताहर 

माडग्याळसह पाणी योजनेपासून वंचित आठ गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करावा, या मागणीसाठी जत शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे यांनी  जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची भेट घेत निवेदन दिले. मंत्री शिवतारे यांनी  ही गावे  समावेश करण्यासाठी जलसंपदा सचिव व अधीक्षक  अभियंता सांगली यांना या भागाचे सर्वेक्षण करुन  गावांचा  समावेश करण्याचे लेखी  आदेश दिले आहेत. यामुळे या  आठ गावांना पाणी मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. 

यासाठी शिवसेना शिष्टमंडळासह सांगलीचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानगुडे - पाटील जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर  यांचे  सहकार्य लाभले.

पाण्यासाठी प्रयत्न

म्हैसाळ योजनेतून वगळण्यात आलेली माडग्याळ , व्हसपेट , गुड्डापूर , राजोबाचीवाडी , आसंगी , गोंधळेवाडी ,कुलाळवाडी , अंकलगी  या गावांचा  म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यात  समावेश होता. पण नंतर मात्र ही गावे का वगळण्यात आली . व्हसपेठ-माडग्याळ  सीमेपासून  मंगळवेढा  तालुक्यात पाणी जाणार असून माडग्याळसह आठ गावे वंचित राहणार आहेत. पण जत तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांनी शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानगुडे -पाटील यांच्यामार्फत पाण्यासाठी पाठपुरावा केला होता.