Fri, Jul 19, 2019 05:29



होमपेज › Sangli › राज्यकर्त्यांकडून शिक्षणाचा बाजार

राज्यकर्त्यांकडून शिक्षणाचा बाजार

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 10:58PM

बुकमार्क करा




वारणावती : वार्ताहर 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत, बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रसार केला. मात्र, आता राज्यकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला असल्याची टीका पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नायकवडी यांनी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

हुतात्मानगर  सोनवडे (ता. शिराळा ) येथे हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नायकवडी बोलत होते. मुख्याधापक एस. जी. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. विजय नांगरे व मुलींनी स्वागत गीत सादर केले. 

नायकवडी म्हणाले, सावित्रीबाईंच्या कार्यांमुळेच आजच्या मुलींना शिक्षण मिळत आहे. पण राज्यकर्त्यानी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यामुळे गोरगरीब व खेड्यातील मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. त्यामुळे आपली गुणवत्ता सिद्ध करून. व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास जीवन सार्थकी लागेल. सांस्कृतिक विभाग प्रमुख  विकास शिंदे, आरती वास्कर, वंदना ठोंबर, वैष्णवी यादव, पूनम काळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक गणपतराव बामणकर, विजय भोसले, शंकरराव गायकवाड, शिवाजी तुपे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.