Thu, May 28, 2020 10:23होमपेज › Sangli › धनगर आरक्षणप्रश्‍नी कवठेमहांकाळ बंद

धनगर आरक्षणप्रश्‍नी कवठेमहांकाळ बंद

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:16PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

धनगर आरक्षणप्रश्नी कवठेमहांकाळमध्ये कडकडीत  बंद पाळण्यात आला. जयसिंगराव शेंडगे, दादासाहेब कोळेकर यांनी बंदची हाक दिली. दुसर्‍या एका गटाने बंद मागे घेतल्याचे जाहीर केले, मात्र आक्रमक युवकांनी बंद करताना आरक्षण तातडीने द्यावे, ही मागणी केली.शहरातील आणि तालुक्यातील व्यवहार बंद होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, असे फलक गावागावांत लावण्यात आले होते. ग्रामीण भागासह शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

मार्केट कमिटीपासून समाजातील तरुणांनी बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली.  तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.मोर्चात जयसिंग शेंडगे, सुरेखा कोळेकर, दादासाहेब कोळेकर, तानाजी यमगर, पतंग यमगर, काशिलिंग कोळेकर, विजय शेजाळ, संजय हजारे, विमल बंडगर, अमोल बंडगर, कृष्णदेव कट्टीकर, इंद्रजीत कोळेकर, अजित दुधाळ, तानाजी शिंगाडे, सुनील हुबाले यांच्यासह अनेक तरुण सहभागी झाले होते.