होमपेज › Sangli › भुईमूग पिकावर बुरशी पडल्याने उत्पन्न घटणार

भुईमूग पिकावर बुरशी पडल्याने उत्पन्न घटणार

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:59PMलिमला : प्रतिनिधी

कडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील विविध गावांच्या शेतशिवारात सध्या भुईमूग काढणीची लगबग चालू आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीसारखे पीक नाही. भुईमुगाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या काळात बुरशीजन्य रोगाने गाठल्याने उत्पन्न घटणार आहे.

दरम्यान वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलावर्ग स्कार्फ, रुमाल आदींचा वापर करत असून काही ठिकाणी जुन्या रितीरिवाजातील मंडळीतील महिला भुईमुगाच्या वेलाची टोपी करून ऊन टाळत भुईमुगाच्या शेंगा काढत आहेत. उन्हाचे दिवस आणि भुईमूग काढणी हे जणू समीकरणच आहे. याच दिवसांत पहिल्या पेरीचे भुईमूग काढायला येतात. जायकवाडी धरण लाभक्षेत्रातील विविध गावांमध्ये यावर्षी भरपूर प्रमाणात भुईमुगाचा पेरा आहे. पाणी पाळ्या वेळेवर होत आल्याने भुईमूग बहरात आला. हंगामाच्या मधल्या काळात वातावरण बदलले, सतत आभाळ येत होते तसेच अवकाळी पाऊसही झाल्याने भुईमुगाला फटका बसला.