Mon, May 20, 2019 20:10होमपेज › Sangli › जत तालुक्यात दुबार पेरणीमुळे संकट 

जत तालुक्यात दुबार पेरणीमुळे संकट 

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:09PMयेळवी : वार्ताहर

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली.   यानंतर या भागात पाऊस पडला नाही. पुढील पावसाच्या आशेने खरीप हंगाम बाजरी, उडीद, मका, भुईमुगाची पेरणी केली होती. पावसाने दांडी दिल्याने, उघडीप दिल्याने शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली आहे.पाऊस पुरेसा न झाल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप  हंगाम  पेरणी एकोणचाळीस हजार हेक्टरवर झाली असून उर्वरीत 48 टक्के पेरणी होणे बाकी आहे. पेरणी केलेली पिके पाण्याअभावी  कोमजून माना टाकत आहेत. 15जुलै पर्यंत पाऊस न पडल्यास खरीप हंगाम  वाया जाण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाचा सर्वच ॠतूमानावर परिणाम झालेला आहे.ढग दाटून येऊनही बरसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

वारे व उन पाहावयास मिळत आहे. मात्र पावसाचे वातावरण तयार होते, पण पाऊस पडत नाही. यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील दुबार पेरणीचे संकट ठेपले आहे.जमिनीची मशागत,  महागडे बियाणे, मजुरी, पेरणीची यंत्रसामुग्री व भाड्याने बैले व टॅक्टरने पेरणी केली होती. याकरिता खर्च आल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सद्यस्थितीत पारंपारिक पद्धतीने बैलजोडीच्या माध्यमातून पेरणी न करता ट्रॅक्टर, यंत्रांद्वारे पेरणी  केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या  पाण्याची टंचाई  भासत आहे. वाळेंखिडी (ता.जत)  येथील ग्रामपंचायत सदस्य  व ग्रामस्थांनी गावाकरिता स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू केला. याबरोबरच  तालुक्यात अशा प्रकाराची सद्यस्थितीत पाणी टंचाई   अनेक गावांत जाणवत आहे.