Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Sangli › गरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू

गरम पाणी अंगावर पडल्यामुळे ऊसतोड मजुराच्या २ मुलांचा मृत्यू

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:24PM

बुकमार्क करा
माजलगाव : प्रतिनिधी

चुलीवरील गरम पाणी अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या माजलगाव येथील ऊसतोड मजुराची दोन मुले पुणे येथे उपचार सुरू असताना मरण पावल्याची घटना शनिवारी घडली. या दोन मुलांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

माजलगाव शहरातील बंजारानगर भागातील विजय शेषराव जाधव व त्यांची पत्नी सविता हे ऊसतोडीसाठी कर्नाटकातील हिंचाळ कारखान्याकडे गेले होते. नेहमीप्रमाणे जात असताना त्यांनी आपली दोन मुले वैष्णव (वय 6) व वैभव (वय 3) यांना आपल्या आजी-आजोबाजवळ सोडले होते. शुक्रवारी (दि. 28) पहाटे आजोबा शेषराव व आजी पुनाबाई यांनी चुलीवर अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले. चुलीचे लाकूड सारण्याच्या नादात चुलीवरील गरम पाण्याचा हंडा या दोन्ही मुलांच्या अंगावर पडला. गरम पाणी अंगावर पडल्याने दोन्ही मुले जखमी झाली. त्यांना परिसरातील शंकर चव्हाण, नामदेव जाधव यांनी तत्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अंबाजोगाई व तेथून दि. 29 रोजी पुणे येथील ससून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. ही बालके 80 ते 90 टक्के भाजल्यामुळे त्यांचा उपचार सुरू असताना शनिवारी  (दि.30) मृत्यू झाला.