होमपेज › Sangli › ‘बीजेएस’मुळे दुष्काळीभागात विक्रमी पाणीसाठा

‘बीजेएस’मुळे दुष्काळीभागात विक्रमी पाणीसाठा

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 8:17PMसांगली : प्रतिनिधी

भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) माध्यमातून राज्यातील 75 तालुक्यातील दीड हजार गावांत दोन महिन्यात  सुमारे 51 कोटी लिटर असा विक्रमी पाणीसाठा करण्याचे काम झाले आहे. सांगली जिल्ह्यात 123 गावांत साडेतीनशे कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली आहे, अशी माहिती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते   म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून 25 वषार्ंपासून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात  योगदान दिले जात आहे. संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी पाच वर्षांपासून राज्य दुष्काळमुक्त करण्याचे काम हाती घेतले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात संघटनेने घेतलेल्या स्पर्धेत सातारा, प्रथम, सोलापूर द्वितीय आणि सांगली जिल्ह्याला तिसरा क्रमांक मिळाला.

जिल्ह्यातील 264  गावांनी स्पर्धेत भाग नोंदवला होता.  ते म्हणाले, या मशिनच्या डिझेलसाठी राज्य सरकारने प्रत्येक गावाला दीड लाख रुपये दिले होते. त्याचा फायदा काम करण्यासाठी झाला. या उपक्रमाला विविध संस्था, कंपन्या आणि व्यक्तींकडून चांगली मदत मिळाली. त्या शिवाय अनेक व्यक्तींनीही सहभाग नोंदवला. जिल्ह्यात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, इतर अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळाले. यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक राजगोंडा पाटील,   अशोक सकळे आदी उपस्थित होते.

सांगलीचा व्यापार, उद्योग इतिहास ग्रंथरुपाने 

सांगलीचा व्यापार, उद्योग आणि शेतीचा गौरवशाली इतिहास हा शंभर वर्षापेक्षा अधिक काळाचा आहे. तो  नव्या पिढीला माहित व्हावा, यासाठी ग्रंथरुपाने मांडण्यात येणार आहे. याबाबत शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचे वेगवेगळे  अनुभव नोंदवण्यात येत आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असेही सुरेश पाटील आणि सुधीर कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.