Sat, Feb 16, 2019 08:42होमपेज › Sangli › सांगलीत औषध विक्री प्रतिनिधींचा मोर्चा

सांगलीत औषध विक्री प्रतिनिधींचा मोर्चा

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 10:38PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी 

विविध मागण्यांसाठी  औषध विक्री प्रतिनिधींनी (एम.आर.)  बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना दिले. 

राज्यातील औषध विक्री प्रतिनिधींच्या मागण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड येेथील बैठकीत आज राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. विश्रामबाग येथील क्रांतिसिंहांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मोर्चास सुरूवात झाली. जिल्ह्यातील औषध  विक्री प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांना  निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, सकाळी दहा ते सहा असे कामाचे सलग आठ तास करावेत, औषध कंपन्यांनी कर्मचार्‍यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करावे, त्याची अंमलबजावणी न करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करावी. प्रतिनिधींना किमान वेतन 20 हजार, त्याशिवाय महागाई भत्ता, पाच टक्के घरभाडे  मिळावे. कामगार कायद्यानुसार बोनस, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा मिळाव्यात या मागण्या केल्या. आंदोलनात महेंद्र कुलकर्णी, हरिश भंडारे, दत्ता शिंदे, किशोर केदारी, किरण पाटील, इरफान मुजावर आदिंच्या नेतृत्वाखाली विक्री प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी  झाले होते.