Tue, Jul 23, 2019 17:35होमपेज › Sangli › सलगरेच्या माळावर ड्रॅगन फ्रूटची शेती

सलगरेच्या माळावर ड्रॅगन फ्रूटची शेती

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:24PM

बुकमार्क करा
लिंगनूर : वार्ताहर

 मिरज तालुक्याच्या टोकावर व कर्नाटक सीमेवर असणार्‍या सलगरेच्या  माळावर  प्रयोगशील शेतीचा बहर आला आहे. एका बाजूला कुसळांचे माळरान आणि दुसर्‍या बाजूला ड्रॅगन फ्रूटची शेती असे दृश्य दिसते आहे. सलगरे परिसरातील प्रयोगशील शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

व्हिएतनाम, इस्त्राईल, थायलंड, श्रीलंका येथे लोकप्रिय असणार्‍या ड्रॅगन फळाची महाराष्ट्रात शेती केली जाऊ लागली आहे. निवडूंग  वर्गात मोडणार्‍या या पिकाची शेती  जत, धुळगाव, सावर्डे, जालिहाळ आणि आता सलगरे येथे ही केली जाऊ लागली आहे.

सलगरेतील ओंकार होनराव हे  तरुण शेतकरी  म्हणाले, या पिकाला  पाणी, मनुष्यबळ, खते, औषधे अत्यंत कमी लागतात. किमान चार तोडी होतात. या फळांची बंगळूर, मुंबई, हैद्राबाद, पुणे येथे विक्री होऊ शकते. दुष्काळी भागात लागण  वाढत
आहे.

 ड्रॅगन फ्रूटचे  मराठीत गुंजाली असे नामकरण करण्यात आले आहे. हे फळ प्लेटलेट्, मधुमेह, लठ्ठपणा, कॅन्सर अशा आजारांवर लाभदायी आहे. बाहेरून लाल व आतून लाल, पिवळ्या व पांढर्‍या या तीन रंगात उत्पादित केले होते.

द्राक्ष बागेला  पर्याय 

या पिकाची द्राक्षबागेप्रमाणे सिमेंट खांब उभे करून वरील बाजूस गोल ट्रे वापरून चार, सहा माहिन्यांचे रोप लावून लागण करता येते. एक किलोपर्यंत वजनाचे फळ येऊ शकते. मार्केटिंग सोपे जावे म्हणून जिल्ह्यातील काही भागात या पिकाची समूह शेतीही केली जात आहे.